Uncategorized

राम खुस्पे

नवी अर्थक्रांती हे एक प्रकाशन असून या अंतर्गत उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित पुस्तके प्रकाशित करण्यात येतात, तसेच व्यवसायात येणाऱ्या सर्व समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते. समाजातील सर्व स्तरावर आर्थिक ज्ञान पोहोचवणे व त्यातून वेगवान विकास घडवून आणणे हे ध्येय घेऊन उद्योगविषयक माहिती, आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान, चालू घडामोडी तसेच प्रेरणादायक गोष्टींनी परिपूर्ण केवळ चांगल्या आणि उत्कृष्ट ज्ञानाचा शोध घेणे व त्याला प्रकाशित करणे, हे काम आम्ही विविध समाज माध्यमांतून करत आहोत.

मागील सहा वर्षात नवी अर्थक्रांतीने सर्वसामान्य मराठी तरुणाला चाकोरीतून बाहेर पडण्याची हिंमत दिली, आपल्या पाठीमागे कोणीतरी भक्कमपणे उभं आहे, कितीही अडचण आली तरी मार्ग काढत पुढे जायचं, पण मागे हटायचं नाही ही जिद्द निर्माण केली. जगात कोणीही आपली समस्या सोडवली नाही, तरी नवी अर्थक्रांती सोडवेल हा विश्वास लोकांच्या मनात जागवला. ९-१० वर्षं बिजनेस करायचा फक्त विचार करणारे लोक नोकरी सोडून बिझनेसमध्ये उतरू लागले. पुढील १० वर्षांत १० लाख तरुणांना रोजगार मिळवून देणे, १ लाख उद्योजक घडवणे हे ध्येय ठेवून आमचे काम सुरु आहे. 

‘नवी अर्थक्रांती’ला अधिक प्रभावी आणि परिपूर्ण करण्यासाठी आपल्या प्रतिक्रियांचे कायमच स्वागत आहे. कृपया आपली प्रतिक्रिया naviarthkranti@gmail.com या ई-मेलवर किंवा 8898 794 864 या व्हॉटसॲप क्रमांकावर कळवा.