जर
– तुम्ही तुमच्या नोकरीत समाधानी नसाल किंवा
– तुम्हाला पगार मनासारखा मिळत नसेल किंवा
– करिअर मध्ये हवी तशी प्रगती होत नसेल किंवा
– नाईलाज म्हणून न आवडणारी नोकरी करावी लागत असेल किंवा
– तुम्ही अशी नोकरी करत असाल जी आयुष्यभर करत राहण्याची तुमची अजिबात ईच्छा नाही किंवा
– बॉसचा वैताग आला असेल किंवा
– तुम्हाला जाणवत असेल, आपण इतर सहकाऱ्यांपेक्षा चांगलं काम करू शकतो पण संधी मिळत नाही किंवा
– बऱ्याच दिवसांपासून एखादी बिझनेस आयडिया डोक्यात घोळत असेल किंवा
– स्वतःचं उद्योग साम्राज्य उभं करायचं असं स्वप्न असेल किंवा
– आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण करण्याची ईच्छा आणि मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य हवं असेल किंवा
– बिझनेस करून भरपूर पैसे कमवावेत असं वाटत असेल
तर
हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.
या पुस्तकात अशा काही पद्धती सांगितल्या आहेत, ज्यामुळे ‘नोकरदार ते यशस्वी उद्योजक’ हे स्वप्न पूर्ण करणं तुमच्यासाठी सोपं होईल. तुमचा प्रवास अधिक वेगाने होईल. या पुस्तकात नोकरीतून उद्योजकतेकडे जाण्यासाठी चार सोप्या पायऱ्या सांगितल्या आहेत. या पायऱ्या इतक्या सोप्या आहेत की कोणीही यांचा सहजपणे वापर करू शकतं. त्यासाठी तुमच्याकडे उद्योजकतेचं ज्ञान असलंच पाहिजे असं काही नाही. या पायऱ्या वापरून तुम्ही तुमच्या नोकरीला आणि बॉसला ‘टाटा-गुडबाय’ म्हणू शकता आणि आपलं स्वप्नातीत आयुष्य जगू शकता.
3 reviews for नोकरीतून उद्योजकतेकडे
There are no reviews yet.